|| मातोश्री ||

राजा श्री शिवराय प्रतिष्ठान


वृद्धांना

माया , आपुलकी , प्रेम , जिव्हाळा मिळणारे हक्काचे घर .

मातोश्री

वृद्धाश्रम

आपली मातोश्री

राजा श्री शिवराय प्रतिष्ठान या समाजसेवी संस्थेने जून १९९९ पासून महाराष्ट्र शासनाच्या मान्यतेने व मदतीने कर्वेनगर येथे मुठा नदीच्या काठी, निसर्गरम्य अशा जागी मातोश्री वृध्दाश्रम सुरू केलेला आहे.

माणसाच्या आयुष्यातील म्हातारपणाचा काळ हा अत्यंत कठीण व वेदनादायी असतो. अशावेळी आपुलकी प्रेम जिव्हाळा व मदत याचीच गरज असते.म्हणूनच समवयस्क मंडळींच्या सहवासात राहून पुढील आयुष्य समाधानांत जावे , यासाठीच मातोश्री वृद्धाश्रम आहे.

हा वृद्धाश्रम फुलझाडे , फळझाडे , वृक्षांनी बहरलेले आहे . निराधार , गरजू व इतर अडचणींमुळे स्वतःच्या इच्छेने येणाऱ्या स्त्री-पुरुषांसाठी निवाऱ्याचे व आनंदाने राहण्यासाठी , सर्व सोयींनी युक्त असे एकत्र कुटुंबाचे मोठे घरच आहे . साठ वर्षांवरील पुरुषांना व पंचावन्न वर्षांवरील स्त्रियांना शासनाच्या नियमाप्रमाणे प्रवेश मिळतो . वृद्धाश्रमांत १२५ वृद्धांची सोय आहे .

सुविधा



निवास

निवासासाठी सर्व सोयींनी युक्त हवेशीर खोल्या , प्रत्येक वृद्धांस स्वतंत्र कॉट , गादी , उशी , चादर , पांघरून , कपडे , गरजेपुरते साहित्य ठेवण्यासाठी लॉकर.

भोजन व्यवस्था

भोजनासाठी स्वतंत्र टेबल खुर्च्या सहित मोठा हॉल.भाजी , पोळी , आमटी , भात , चटणी/कोशिंबीर /लोणचे , सायंकाळी चुलीवरची गरम ज्वारीची भाकरी अशा प्रकारचे सकस जेवण. प्रत्येक रविवारी आणि सणासुदीला मिष्टान्न भोजन.

आरोग्य सुविधा

वृद्धाश्रमांत स्वतंत्र दवाखाना असून डॉक्टरांची सेवा उपलब्ध असते . वृद्धांची वेळोवेळी तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून विनामूल्य औषधोपचार केला जातो , त्यांच्या सल्ल्यानुसार विविध आरोग्य शिबिरे घेतात .

ग्रंथालय

ग्रंथालयासाठी सुसज्ज असा स्वतंत्र हॉल असून त्यात धार्मिक ग्रंथ व वेगवेगळ्या विषयांची विविध पुस्तके तसेच मासिके व वर्तमानपत्रे उपलब्ध असतात .

सांस्कृतिक हॉल

सुसज्ज असा स्वतंत्र सांस्कृतिक हॉल असून तेथे केबल टीव्ही आहे . भजन , कीर्तने , प्रवचने , व्याख्याने व गायनाचे तसेच इतरही सांस्कृतिक व करमणुकीचे कार्यक्रम होत असतात .

बाग

बागेमध्ये विविध प्रकारचे वृक्ष , फळझाडे , फुलझाडे व भाजीपाला पिकवला जातो. बसण्यासाठी ठीकठिकाणी सिमेंटचे बाक ठेवले आहेत . तसेच फिरण्यासाठी जॉगिंग ट्रॅक आहे .

स्वच्छ परिसर

प्रशस्त , स्वच्छ , नीटनेटका व हवेशीर परिसर असून भरपूर मोकळी जागा आहे.

राष्ट्रीय सण

२६ जानेवारी , १५ ऑगस्ट हे राष्ट्रीय सण व महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी साजरा केला जातात.

गाठी भेटी

अनेक स्वयंसेवा संस्था शाळा कॉलेजमधील विद्यार्थी व मान्यवर वृद्धाश्रमाला भेटी देत असतात.



न्याहारी



सांस्कृतिक कार्यक्रम



दूरदर्शन कार्यक्रम पाहणे



व्यायाम



वाचन



सामूहिक प्रार्थना



जेवण



फिरणे

वृद्धाश्रमातील दिनक्रम

स. ५.३० ते ६.२५ - प्रातःर्विधी आटोपणे
स. ६.३० ते ६.५५ - सामूहिक प्रार्थना
स. ७.०० ते ७.१५ - चहा
स. ८.०० ते ८.३० - न्याहारी
स. ८.३५ ते ९.५० - वैयक्तिक कामे , नामस्मरण , वाचन
स. १०.०० ते ११.०० - व्यायाम , आवडीप्रमाणे काम
दु. १२.०० ते १.०० - जेवण
दु. १.३० ते ३.३० - विश्रांती
दु. ४.०० - चहा
संध्या. ४.३० ते ५.३० - भजन , सांस्कृतिक व करमणुकीचे कार्यक्रम
संध्या. ५.४५ ते ६.४५ - फिरणे व वैयक्तिक काम
संध्या. ७.०० ते ७.४५ - जेवण
संध्या. ८.०० ते ९.३० - दूरदर्शन कार्यक्रम पाहणे
संध्या.९.४५ - दिवाबत्ती बंद
संध्या.९.४५ - दिवाबत्ती बंद

चित्रदालन


भोजनगृह

ग्रंथालय

बागकाम

परिसर

निवास

आरोग्य सुविधा

राष्ट्रीय सण

गाठी भेटी

सांस्कृतिक हॉल

वृद्धाश्रम मदतीसाठी आपण हे करू शकता



  • वृद्धाच्या परिपोषणासाठी देणगी देऊन पालकत्व स्वीकारणे .
  • कपडे , धान्य , किराणा माल , भाजीपाला , फळे , फराळाचे साहित्य इत्यादी साहित्याची मदत , फर्निचर , पुस्तके , भांडी , अंथरूण-पांघरून , बागकाम साहित्य , रुग्णोपयोगी साहित्य इत्यादी .
  • प्रिय व्यक्तीचा वाढदिवस , शुभकार्यानिमित्त तसेच स्मरणार्थ देणगी , एक वेळचे जेवण किंवा न्याहारीचे व्यवस्था करणे .
  • प्रिय व्यक्तीच्या स्मरणार्थ वर्षातून एकदा मिष्टान्न भोजन देणे .

आपण दिलेली देणगी आयकर चे कलम ८०-जी खाली करमुक्त राहील .

वृद्धाश्रम म्हणजे वानप्रस्थाश्रम ही आज काळाची व समाजाची गरज झाली आहे . वृद्धांचे हे आनंदी निवासस्थान , मनःशांती चे ठिकाण आहे , याच भावनेमधून मातोश्री काम करीत आहे . आपलाही या सेवेमध्ये सहभाग असावा , अशी दोन्ही कर जोडून विनंती.



आपला नम्र

शशिकांतभाऊ सुतार

अध्यक्ष - मातोश्री वृद्धाश्रम

संपर्क


मातोश्री वृद्धाश्रम , राजाराम पुलाजवळ कर्वेनगर,पुणे-४११०५२.

matoshripune@gmail.com

९६५७७१६८८५ , ९०७५७७९२८०